प्रिय मी,
आपण आता परभणी मध्ये राहतोय म्हणजे आपला संवाद आता होत राहणार.
आजचा विषय...
आपण काबाड-कष्ट करून शिका सवरा, नोकरीला लागा, तिथेही जीव तोडून मेहनत करा. त्यातही स्वतः शांत राहुन आणि आपल्या कामाशी काम ठेवून, duty च्या 8 तासात आपल्या duty तले सगळे कामं संपवून लवकरात लवकर घरी जाण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा. स्वतःची Mental Health सांभाळुन Personal Life, Family Life, Professional Life वेगवेगळी ठेवण्याला Priority दया. पण तरीही कुणी तरी विनाकारण येवून तुम्हाला डिवचणार आणि शांत आणि सुरळीत चाललेल्या तुमच्या आयुष्याला सुरूंग लावणार.
थोडक्यात काय तर, आपण शांत आहोत म्हणजे आपण निव्वळच कमजोर आहोत, भित्रे आहोत, षंढ आहोत असा समज करून घेऊन आपल्याला विनाकारण धमक्या देणार, आपल्या तक्रारी करणार😡
असली रिकामटेकडी लोकं आपल्याला नीट करता येणार नाहीत अशातला भाग आहे का? तर नाही ना... पण सध्या आपला Focus आपली Personal, Professional आणि Family Life Better कशी होईल यावर आहे ना. आपली Priority आपण ठरवलेली आहे ना त्यामुळे सध्या तरी शांत राहणं हाच पर्याय आहे.
नसता राडा कसा घालतात, तक्रारी कशा करतात आणि धमक्याही कशा देतात याचं प्रात्यक्षिक दाखवायला वेळच कितीक लागणारेय आपल्याला. असेही आपण स्वतःला अजुनही बेरोजगार आणि रिकामटेकडेच समजतो.
आपल्या गरजाही काही तेव्हढ्या नाहीत, आपण ही नाही तर ती नोकरी करू आणि आपला स्वतःचा पोटापाण्याचा प्रश्न मिटवू. आपले घरचे तर आपल्याकडून असाही रुपयासुद्धा घेत नाहीत. आपल्याला ना लेकरं ना बाळ, ना नवरा ना संसार, आपल्याला कुठं कुणाला जगवायचंय लगे. पण नाही शिल्पा शांत रहा, किती वर्षांनंतर आपला राग कमी झालाय. आपण विधायक म्हणता येतील अशी कामं करतोय, व्यक्तीमत्व विकासावर भर देतोय. पुस्तकं वाचतोय. पुस्तकं लिहितोय. मस्त झोपा काढतोय, आपल्या घरी राहतोय. हे सगळं आपल्याला फक्त भांडणापायी वाया घालवायचं नाहीये.
आपली एक तक्रार आणि समोरच्या माणसाची बोलती बंद. पण तरीही आज घडलेल्या गोष्टी आजच विसरून जाऊ आणि निवांत जेवण करून सुखाने झोपी जावू.
राहता राहीला प्रश्न धमकी, खोट्या तक्रारी आणि इतर कशाचाही तर पुन्हा एकदा समोरच्याने सुरुवात करु देत मग शेवट आपण करुता.
हां पण, Hospital Duty मध्ये असले प्रकार घडणं मात्र Normalise करायचं नाही ही जबाबदारी घेऊन🙂
©Shilpa ek Shaayaraa
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here