*विरा परतुनी ये*
तुमच्या कार्याला तोड नाही
आणि पूर्ण करेल साहस तूमच्यासारख
असा दुसर जोड ही नाही
तुमच्या नसण्याने आता
पूर्ण गाव सूना झाला
मित्र परिवार पूर्ण
पोरका झाला
शब्दात वर्णू कसा मित्रा
तुमची थोरवी लीहतांना
लेखणीही विचारात पडली
शब्दांना ही खूप दुःख झालं
तुमच्या आठवणी चे तरंग
उठती चहूकडे
विरा परतुनी या गावाकडे,,,,
आई,दादा,वहिनी ,भाचा,भाचीस
ताई भाऊजी,सगे सोयऱ्या च्या भेटीस
आणि गावातील संपूर्ण मंडळीस
आहे तुम्हा मायभुमीची आण
तुम्ही दिलं देशाच्या रक्षणासाठी प्राण
वाढविली भारत देशाची शान
म्हणून आपला भारत देश महान
विरा परतुनी ये ,,,,,
आधार द्याया आणि आधार व्हाया
तुमच्या कर्तृत्वाचा एकही कत्रा
कुणामध्येच दिसत नाही
व्यसनाधीनता अधिक वाढून
ती कमीच होत नाही
विरा झाले हजार आता सैनिक
पण तुमच्या समान नाही
देतील शब्द कितीही आम्हाला ते
पण तुमच्यासारखी जबान नाही
विरा परतुनी ये,,,,,,,,
महेंद्र भाऊ बोपचे यांच्य
तिसऱ्या पुण्यतिथी निमित्त शब्दरुपी पुष्प
कवि. बाळकृष्ण राऊत(बबलू राऊत)
शिलापुर/देवरी
दि.14/01/2025
वेळ.12.00am
©Bablukumar Raut
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here