Unsplash येतील लाख वादळे, भेदून काढू....
वाढ माझी खुंटेल, असे शस्त्र अजून होणे नाही...
षडयंत्र सारे तुमचे, सफल होणे संभग नाही...
हाटलो जरी असेल, मी माघे...
तुमच्या कूट नीतीने...
तयार रहा!...
येईल मी लाख वेगाने,
होऊनी वादळ...
पचणार नाही सुख माझे,
कुणाच्यातरी पोटी....
तेव्हा होऊनी सारथी,
न्याय तो नक्कीच देईल...
जेव्हा तू असशी सोबती माझ्या,
खंत काय ती लढण्या...
येतील अडथळे असंख्य,
ती सर्व भेदून काढू...
खच वाटेवरी चालतांना,
साथ मला तुझी हवी..
आहे आशीर्वाद रूपाचे कवच मला तुझे,
भेदू शकेल अस्त्र नाही...
शेवट माझा, माझ्या यशाचा...
कोणी करू शकेल असे शक्यच नाही...
मग!...कशाला चिंता कशाची,
जाळेल जो, तो आपली चिता..
आपुल्याचं कर्मानी..
हे ईश्वरा...
काहीही नकोय मला, फक्त दे अंदन,
दे बुद्धी माझ्या ओंजळीत भिकेची...
काय खरे, काय खोटे, काय चांगले, काय वाईट....
समजण्याची...
माझ्या ऱ्हासाची अन अंतांची...
©Rohidas Chavan
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here