|| जय मार्कंडेय ||
करू तुझी आराधना,
करू तुझी प्रार्थना...!
नमन मार्कंडेयश्वरा रे..
नमन मार्कंडेयश्वरा...!!धृ!!
अल्पायुषी वरदान ठरले खोटे,
शिवशक्तीने अमरत्व मिळविले...
धन्य हो जीवन आमचे...
महंत कुलदैवत आम्हा लाभले..||१||
थोर तुझी महिमा..
थोर तुझी भक्ती..
कलीयुगात ही आस्था जागे..
अशी उदात्त रचना तुझी..||२||
महामृत्युंजय सिध्दीचे ते सामर्थ्य
होतील सारे रोग नष्ट...!
वाचून देवीचे ते माहात्म्य
पळून जाई सारे कष्ट..||३||
कृपा तुझी नित्य राहू दे..
आम्हा भक्तांवरी..!
अखंड हृदयी वसू दे..
मंजूळ आध्यात्माची गोडी..! ||4||
*पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महर्षी मार्कण्डेय
जयंती निमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा......!*
💐💐💐💐💐💐
सौ. अनुसया संभाजी नर्तावार
©Asha...#anu
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here