समीर

समीर

  • Latest
  • Popular
  • Video
#संवाद

#संवाद हरवत चाललाय आपल्यातला कुठेतरी

79 View

संवाद हरवत चाललाय आपल्यातला कुठेतरी, कुठे ते नक्क्की ठाऊक नाही, कदाचित तुझ्याशी सारखं बोलण्याच्या इच्छेत, किंवा तुझं माझ्याशी न बोलण्याच्या इच्छेत... संवाद हरवत चाललाय आपल्यातला कुठेतरी, कदाचित तुझ्याशी न बोलता राहावंत नाही म्हणुन मी सारखं बोलतो... पण दिवसभराच्या कामातून हल्ली तुला वेळ कमी पडतो .. संवाद हरवत चाललाय आपल्यातला कुठेतरी, पूर्वी सारखे तासनतास फोन नाही होत हल्ली रात्रीअपरात्री आपल्यात... ना कधी आठवण काढतेस जेव्हा तु रुसुन बसतेस शांत एका कोपऱ्यात.. संवाद हरवत चाललाय आपक्यातला कुठेतरी, सारख ऑनलाईन बोलण्यानी की तुला सारखा मेसेज केल्यानी..? ठाऊक नाही पण मनातल्या भावना नक्कीच कुठेतरी रुसुन बसल्यात तुझ्या एवढं मात्र नक्की... आभास

 संवाद हरवत चाललाय 
आपल्यातला कुठेतरी,
कुठे ते नक्क्की ठाऊक नाही,
कदाचित तुझ्याशी सारखं 
बोलण्याच्या इच्छेत,
किंवा तुझं माझ्याशी 
न बोलण्याच्या इच्छेत...

संवाद हरवत चाललाय 
आपल्यातला कुठेतरी,
कदाचित तुझ्याशी न बोलता 
राहावंत नाही म्हणुन 
मी सारखं बोलतो...
पण दिवसभराच्या कामातून
हल्ली तुला वेळ कमी पडतो ..

संवाद हरवत चाललाय 
आपल्यातला कुठेतरी,
पूर्वी सारखे तासनतास 
फोन नाही होत हल्ली 
रात्रीअपरात्री आपल्यात...
ना कधी आठवण काढतेस जेव्हा 
तु रुसुन बसतेस
 शांत एका कोपऱ्यात..

संवाद हरवत चाललाय 
आपक्यातला कुठेतरी,
सारख ऑनलाईन बोलण्यानी
की तुला सारखा मेसेज केल्यानी..?
ठाऊक नाही पण 
मनातल्या भावना नक्कीच कुठेतरी 
रुसुन बसल्यात तुझ्या एवढं मात्र नक्की...
आभास

संवाद हरवत चाललाय आपल्यातला कुठेतरी, कुठे ते नक्क्की ठाऊक नाही, कदाचित तुझ्याशी सारखं बोलण्याच्या इच्छेत, किंवा तुझं माझ्याशी न बोलण्याच्या इच्छेत... संवाद हरवत चाललाय आपल्यातला कुठेतरी, कदाचित तुझ्याशी न बोलता राहावंत नाही म्हणुन मी सारखं बोलतो... पण दिवसभराच्या कामातून हल्ली तुला वेळ कमी पडतो .. संवाद हरवत चाललाय आपल्यातला कुठेतरी, पूर्वी सारखे तासनतास फोन नाही होत हल्ली रात्रीअपरात्री आपल्यात... ना कधी आठवण काढतेस जेव्हा तु रुसुन बसतेस शांत एका कोपऱ्यात.. संवाद हरवत चाललाय आपक्यातला कुठेतरी, सारख ऑनलाईन बोलण्यानी की तुला सारखा मेसेज केल्यानी..? ठाऊक नाही पण मनातल्या भावना नक्कीच कुठेतरी रुसुन बसल्यात तुझ्या एवढं मात्र नक्की... आभास

5 Love

#देवमाझा

मंदिराच्या गाभाऱ्यात शोधता शोधता तु तर मनाच्या कोपऱ्यात भेटलास... उगाच फिरलो वणवण तु तर प्रत्येकात विसावलास... आभास

 मंदिराच्या गाभाऱ्यात शोधता शोधता
तु तर मनाच्या कोपऱ्यात भेटलास...
उगाच फिरलो वणवण 
तु तर प्रत्येकात विसावलास...
आभास

मंदिराच्या गाभाऱ्यात शोधता शोधता तु तर मनाच्या कोपऱ्यात भेटलास... उगाच फिरलो वणवण तु तर प्रत्येकात विसावलास... आभास

4 Love

#आभास

तू ,मी,पाऊस  आणि आपल्या दोघात एकच छत्री जोरदार पाऊस येऊदे सोसाट्याचा वारा सुटू दे शोधू आडोसा कुठेतरी तू मी पाऊस आणि आपल्या दोघात एकच छत्री तू भिजल्यावर चिडचिड करते पण मला तुझे तेच ओलेचिंब रूप आवडते मग तुही घेतेस मला भिजायला कारण छत्रीत जागाच नसते.. तू मी ,पाऊस आणि आपल्या दोघात एकच छत्री वाफाळलेला चहा हवा तुला गरमागरम भजी हवी बरसूदेत फक्त सरींवर सरी तू मी पाऊस आणि आपल्या दोघात एकच छत्री संध्याकाळची ती कातर वेळ पावसाचाही खट्याळ खेळ सतत एकच भीती अंतरी आपल्याला पाहिल कोणीतरी तू मी ,पाऊस आणि आपल्या दोघात एकच छत्री आभास

#आभास  तू ,मी,पाऊस  
आणि आपल्या दोघात एकच छत्री 
जोरदार पाऊस येऊदे
सोसाट्याचा वारा सुटू दे
शोधू आडोसा कुठेतरी 
तू मी पाऊस 
आणि आपल्या दोघात एकच छत्री 

तू भिजल्यावर चिडचिड करते
पण मला तुझे तेच ओलेचिंब रूप आवडते
मग तुही घेतेस मला भिजायला 
कारण छत्रीत जागाच नसते..
तू मी ,पाऊस 
आणि आपल्या दोघात एकच छत्री 

वाफाळलेला चहा हवा तुला
गरमागरम भजी हवी
बरसूदेत फक्त सरींवर सरी
तू मी पाऊस 
आणि आपल्या दोघात एकच छत्री 

संध्याकाळची ती कातर वेळ 
पावसाचाही खट्याळ खेळ 
सतत एकच भीती अंतरी
आपल्याला पाहिल कोणीतरी
तू मी ,पाऊस आणि आपल्या दोघात एकच छत्री 

आभास
Trending Topic