Tejaa Bhai

Tejaa Bhai Lives in Dombivli, Maharashtra, India

अल्फाजों का क्या है, जब मौज़ हो तब स्याही से कागज़ पर उतर जातें हैं ......

  • Latest
  • Popular
  • Video
#मराठीप्रेरक #HappyStorytelling

#एक_जीवन #मराठीकविता #प्रेरक_कविता #एकांकिका #नाटक

90 View

एकटीला एकटीची सोबत झाली जेव्हा.. ...ती मीरा झाली... अन् राधा झाली कृष्ण भेटला तेव्हा... रणरणत्या उन्हात सावलीचं काळीज घेऊन पाऊस झाली रूक्मिणी होऊन... कैक रूपं घेतली असतील तिनं ही तुझ्यावर प्रेम करता करता... तुझी प्रीत झाली प्रेम झालास जेव्हा.. तुझी वेणू झाली...स्वर झालास तेव्हा जेव्हा जेव्हा सावली दाटून आली तिची... तुझं ऊनही भरून आलं बघ तेव्हा... तिचं शोधणं सापडणं गुंतणं हरवणं सारं काही तुझ्याचठायी कारण ती म्हणजे निरपेक्ष श्वास तुझा आणि तू तिची अविरत स्पंदनं... कृष्ण.. ©Tejaa Bhai

#मराठीकविता #janmashtami  एकटीला एकटीची सोबत झाली जेव्हा..
...ती मीरा झाली...
अन् राधा झाली 
कृष्ण भेटला तेव्हा...
रणरणत्या उन्हात 
सावलीचं काळीज घेऊन 
पाऊस झाली रूक्मिणी होऊन...
कैक रूपं घेतली असतील तिनं ही तुझ्यावर प्रेम करता करता...
तुझी प्रीत झाली प्रेम झालास जेव्हा..
तुझी वेणू झाली...स्वर झालास तेव्हा
जेव्हा जेव्हा सावली दाटून आली तिची... 
तुझं ऊनही भरून आलं बघ तेव्हा...
तिचं शोधणं
सापडणं
गुंतणं
हरवणं
सारं काही तुझ्याचठायी
कारण ती म्हणजे निरपेक्ष श्वास तुझा 
आणि तू तिची अविरत स्पंदनं...

कृष्ण..

©Tejaa Bhai

#janmashtami

6 Love

#मराठीकविता #प्रेम #कविता #नातं  कातरवेळी तुला पाहताना काय होत असावं, श्र्वासांच्या लयीचं? 
धड-धडणाऱ्या काळजाचं? 
ओंजळीत वाहताना थरथरणाऱ्या सोनचाफ्याचं? 
आणि तुला पाहताना चिंब होणाऱ्या डोळ्यांचं काय होतं असावं? 
का लपवावा लागतोय आपला भूतकाळ, आपल्या पासूनच? 
त्यात रमण्याची मजा तर दोघेही घेत आहोत !
कुठं शोधणार आहोत असं ओतप्रोत प्रेम? 
हि ओढ, ही आसक्ती? 
काय हवंय नेमकं आपल्याला एकमेकांना कडून?
म्हणतात, नातं म्हणजे to grow inwardly with each other. 
वयाप्रमाणे आपलं प्रेम ही mature होत जातंय ! 
कारण, प्रेम करण्यासाठी आपलं जवळ असणं गरजेचं नाही, 
तुझं "मी" होणं आणि माझं "तू" होणं इतकचं पुरेसं आहे, 
काय होत असावं जाणून घेण्यासाठी !
✍🏼

©Tejaa Bhai
#sadstory

#sadstory उद्या तिचा वाढदिवस... कविता - सौमित्र स्वर तेजस गुरुजी.

184 View

भरून येता आठवणींचे आभाळ, कंठात दाटुनी यावे... सरींनी बरसावी दुःख, तरी सुख बहरूनी यावे... थेंबांना सावरावे वा अश्रूंना पांघरावे, आषाढ घन बरसूनी, आयुष्य मोहरून जावे... पाऊसपाण्यानीं, गाण्यांनी अंग भिजावे, कवितेच्या ओळींतून, अंकुर नवे फुटावे..... -Tejaa Bhai

#MarathiKavita #lifegoeson #Happiness #Memories #Umbrella  भरून येता आठवणींचे आभाळ, कंठात दाटुनी यावे...
सरींनी बरसावी दुःख, तरी सुख बहरूनी यावे... 

थेंबांना सावरावे वा अश्रूंना पांघरावे,
आषाढ घन बरसूनी, आयुष्य मोहरून जावे...

पाऊसपाण्यानीं, गाण्यांनी अंग भिजावे, 
कवितेच्या ओळींतून, अंकुर नवे फुटावे..... 

-Tejaa Bhai

#Umbrella काही आठवणी ह्या वाहत्या पाण्यासारख्या असतात तर काही पाऊसपाण्यासारख्या #MarathiKavita #Memories #Happiness #sadness #lifegoeson #Faith @nojotoapp

4 Love

Trending Topic