सुख म्हणजे नक्की काय असतं ?
प्रत्येकाच्यापरिने ते वेगवेगळं असतं
पाहिलं तर आनंद, अनुभवलं तर समाधान असतं
सुख परिभाषेत नसुन, ते भावनेत असतं
आईच्या प्रेमात तर बापाच्या रागात असतं
आजीच्या त्या २ रुपयात तर आजोबांच्या आशिर्वादात असतं
सुख बंगल्यातही असतं, झोपडीत ही असतं
जिथं मानसं जुळतात तिथंच ते नांदत असतं
सुख शहरातही असतं, गावातही असतं
आपुलकी, जिव्हाळा, प्रेमात फुलत असतं
सुख पिझ्झा बर्गर मद्धे ही असतं, कांदा भाकरीत ही असतं
पण घाम गाळून कष्टाचं खाण्याची चवच न्यारी असतं
सुख मुलात ही असतं, सुख मुलीत ही असतं
समाजात मात्र वंशाच्या दिव्यालाचं गाजावाजा असतं
सुख लहान असण्यात असतं, मोठही असण्यात असतं
मनानं मोठं झाल्यास सगळं लहान होऊन अनुभवायचं असतं
सुख आमच्यात असतं, सुख तुमच्यातही असतं
पाहिलं तर आनंद अनुभवलं तर समाधान असतं...
©Komal Parteki
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here