Sign in
Keshav

Keshav

  • Latest
  • Popular
  • Video

White आता कुठे कविता आता कुठल्या कविता, कवितेसाठी 'मन' लागतं, जे हल्ली 'उडून' गेलंय... थोडासा 'जीव' लागतो चवी पुरता,परंतु तो ही आता 'बेचव' झालाय... थोड्या 'वेदना' लागतात,*पण त्या ही 'भांड्यात पडल्यात.. *आता कुठल्या कविता, *कवितेसाठी 'मन' लागतं, *जे हल्ली 'उडून' गेलंय... कांहीसा निवांत क्षण लागतो, शब्दांच्या प्रेमळ स्पर्शासाठी... 'आसवे' लागतात जे शाई सरशी अलगद कोरीत असतात मुलायम *पानांचे बारीक धागे.... *पण हल्ली* *ते पण सुकून गेलेत.... आता कुठल्या 'कविता'... कवितेसाठी 'वय' लागत... अन थोडंसं 'शब्दांच भय' लागतं... किंचितसे 'मोती' लागतात, भावनांचा 'गुलकंद' लागतो... आता...जीवन 'कविता' नाही *'सारांश' आहे..* *यमकाच्या गाठोड्यातील,* *विंचवाचा दंश' आहे... ©Keshav

#मराठीकविता  White आता कुठे कविता

आता कुठल्या कविता, कवितेसाठी 'मन' लागतं,
जे हल्ली 'उडून' गेलंय...

थोडासा 'जीव' लागतो चवी पुरता,परंतु तो ही आता 'बेचव' झालाय...

थोड्या 'वेदना' लागतात,*पण त्या ही 'भांड्यात पडल्यात..

*आता कुठल्या कविता, *कवितेसाठी 'मन' लागतं,
*जे हल्ली 'उडून' गेलंय...

कांहीसा निवांत क्षण लागतो,  शब्दांच्या प्रेमळ स्पर्शासाठी...

'आसवे' लागतात जे शाई सरशी
अलगद कोरीत असतात मुलायम
*पानांचे बारीक धागे....
*पण हल्ली* *ते पण सुकून गेलेत....

आता कुठल्या 'कविता'...
कवितेसाठी 'वय' लागत...
अन थोडंसं 'शब्दांच भय' लागतं...
किंचितसे 'मोती' लागतात,
भावनांचा 'गुलकंद' लागतो...

आता...जीवन 'कविता' नाही
*'सारांश' आहे..*
*यमकाच्या गाठोड्यातील,*
*विंचवाचा दंश' आहे...

©Keshav

poems छोटी कविता मराठी

16 Love

Trending Topic