माझं नाव शशिकांत गुरव. मी महाराष्ट्रातील एका छोट्याश्या थंड हवेच्या ठिकाणी आंबोली येथे जन्माला आलो. माझा तालूका सावंतवाडी असून जिल्हा सिंधुदूर्ग आहे. माझं शालेय शिक्षण माझ्या गावातच पुर्ण झालं. कॉलेज शिक्षण सावंतवाडी येथे पुर्ण झालं. मी Agriculture , Electrical ,CNC programmer ,VMC Programmer, Welder, Machinist, Civil construction अशा विविध क्षेत्रातील शिक्षण , प्रशिक्षण घेत आहे.घेतलं आहे. विविध क्षेत्रातील शिक्षण , प्रशिक्षण घेणं माझा एक छंद आहे. तर अभिनय करणं हा माझा दुय्यम छंद आहे. माझं गाव मला खुप आवडतं . त्यामुळे माझं गाव सोडून मला परगावी जावसं वाटत नाही आणि तसा योग अजून पर्यत आला नाही. काही अपवादात्मक स्थितीत काही कालावधी परगावी जावं लागलं किंवा जावं लागतं .परंतु मला माझ्या आई वडीलांसोबत आपल्या गावातच राहायला आवडतं. माझ्या आजपर्यतच्या आयुष्यात अनेक लोकांशी संपर्क आला. अनेक वेगवेगळ्या व्यक्तीमत्वांच्या भेटी घडल्या. काहि हृदयातली अगदी जवळची माणसं खुप दुर गेली तर काही दुरची माणसं जवळ आली. आयुष्यात अनेक लोकांनी ,मित्रांनी,नातेवाईकांनी सोबत दिली.आणि भावी आयुष्यात अशीच सोबत मिळत रहावी हिच इच्छा .
https://youtube.com/@shashikant_gurav?si=lPWA3Uulnc_FTJ2P
Will restore all stories present before deactivation.
It may take sometime to restore your stories.
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here