Unsplash तुला मनावर राज्य करायचंय की घरावर
आता ते तूच ठरव...
प्रेयसी म्हणूनच राहायचंय तर मनावर राज्य असेल
आणि घरावर राज्य करायचंय तर बायको व्हावं लागेल
म्हणून तुझं तू ठरव...
फक्त एका गोष्टीवर राज्य करायचंय
की दोन्ही वर तुला राज्य करायचं असेल
तुझं तूच ठरव..
तुला तुझं स्थान कुठं हवंय माझ्या आयुष्यात
तुझं तूच ठरव..
तुला सारं काही कायमचं गमवायचंय
की संपूर्ण माझ्यावर राज्य करायचंय
तुझं तूच ठरव..
नकळत मिळालेल्या संधीचं प्रयत्न करून सोनं करायचंय
की घाबरून कायमचं सगळं सोडून द्यायचंय
तुझं तूच ठरव..
माझ्या आयुष्यातील तुला इतिहास बनून राहायचंय
की येणाऱ्या भविष्याचा विचार करायचंय
तुझं तूच ठरव..
तू बघितलेल्या स्वप्नाला सत्यात उतरवायचंय
की सत्यात तुझ्या जागी दुसरी कोणाला
माझ्या आयुष्यात बघायचंय
तुझं तूच ठरव...
©अश्लेष माडे (प्रीत कवी )
मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता संग्रह तुझी माझी जोडी मराठी प्रेम स्टेटस मन उनाड झालया