अबोल क्षणाचे होतो आपण अबोल सोबती
कुठे कळलं होत क्षणाची भेट जन्माची गाठ होती
मनात होणाऱ्या असंख्य हालचालीना शब्द च नव्हते
ते वेक्त करताना
मी भारले होते तुझ्या न झालेल्या स्पर्शाने
तुझ्या त्या हालचाली अनाहुतपणे मला
तुझ्या कडे खेचत होत्या,
बहरलं नात दिवसागणिक आपलं
नवी उमेद, नवीन अपेक्षा, नवं जग त्याने हळू हळू गाठलं
अशीच असू दे तुझी माझी सोबत
क्षणभर ही नको आपल्यात दुराव्याची संगत
मनाच्या तलाशी जाऊन ते रुतत
प्रेमाच नात तर खरच असंच असत
©Monika
#सुंदर नाते