घन दाटून यावे..
घन दाटून यावे अन् बरसुन जावे
मनातील किल्मिष जसे ओघळावे....
घन दाटून यावे अन् बरसुन जावे
व्याकुळ मनाचे बांध फुटावे....
घन दाटून यावे अन् बरसुन जावे
ओशाळल्या धरेला बिलगून जावे....
घन दाटून यावे अन् बरसुन जावे
भान विसरुनी चिंब भिजून जावे....
घन दाटून यावे अन् बरसुनी जावे
सर्व पाशांतूनी ऋणमुक्त व्हावे.....
अमिता🌸✍️
©Amita
#rain
#मराठीकविता