White विठाई
विटेवरी उभे |परब्रम्ह आहे
विठाई ती आहे|माय माझी. १
कर कटेवरी |उभा विटेवरी
सावळा श्रीहरी|शोभतसे. २
समचरण जे|डोळा साठवितो
मना ठसवितो|विष्णुरूप. ३
पुंडलिका साठी|उभा भिमेकाठी
तो हा जगजेठी |कृपा करी. ४
भक्तांचा कैवारी|अनाथांचा नाथ
संकटात साथ. |नित्य देई. ५
पंढरीचा राणा| आहे माझा देव
नाही दुजा भाव|दास म्हणे. ६
©®सोमदत्त कुलकर्णी
हडपसर पुणे
©somadatta kulkarni
#Sad_shayri Hinduism