White तुझ्या मिठीची ओढ
मनी अजूनी आहे.
हातातल्या हातांची
उब अजूनी आहे.
तुझ्या नसण्याची
उणीव नाही आता.
सोबतीच्या क्षणांची
साथ अजुनी आहे.
तुला पाहण्याची
ओढ नाही आता.
डोळ्यात रूप तुझे
कोरलेले अजून आहे.
स्पर्श, गंध,जाणीव, उणीव
काहीच नसे साथीला.
आठवणींचा पसारा
भोवताली अजून आहे.
©Principal Azhar Golandaj