पानगळ
वाढत आहे चिंता आता पानगळीची...
घुसमट भीती मनात असते वावटळीची!
लागत नाही खरेच काही वृद्ध जिवाला...
हवी जराशी विचारणाच बस कळकळीची!
मरण्यासाठी जगण्याची तर कसरत सारी...
प्रत्येकाची जिंदगीच ही धावपळीची!
जीवनभर रंगाढंगाची प्यालो मदिरा...
नशा तशी ना चवही कोठे जशी मळीची...
व्हावे सारे मनासारखे वाटायाचे...
उठाव मोर्चे चळवळ झाली बाब कळीची!
जयराम धोंगडे
©Jairam Dhongade
#leaf मराठी शायरी नवीन