तिरंगा
जगाने भुलावे असा हा तिरंगा...
नभी शोभणारा बघावा तिरंगा!
बघा केशरी ती छटा सांगते की...
जरा स्वार्थ त्यागा स्मरावा तिरंगा!
धवल रंग शांती सुखाचा पुकारा...
अहिंसेस पाळा म्हणाला तिरंगा!
फुलावे फळावे हरितरंग बोले...
नको दुःख कोणा जपावा तिरंगा!
निळे चक्र धावे सदोदित पहारा...
रहा नित्य कामी भजावा तिरंगा!
खरी शान ठेवा तुला आन त्याची...
गुणा बान तू ना झुकावा तिरंगा!
जयराम धोंगडे, नांदेड
©Jairam Dhongade
#Desh_ke_liye