मराठी नाद गर्जतो सह्याद्रीच्या कडे-कपारी, कंठी उद् | मराठी कविता

"मराठी नाद गर्जतो सह्याद्रीच्या कडे-कपारी, कंठी उद्घोष धन्य आमची वैखरी, महामंत्र असा स्फूर्ति हृदय अंतरी, हर हर महादेव शिव छत्रपति, उजळती किरणे सुर्याची राष्ट्र हे मराठी ! आकाशी लहरे विजयी पताका भगवी, त्याग, शौर्य, मराठी अस्मितेची निशाणी, भरूनी मळवट रणचंडिके माय भवानी, तोफांचे चौघडे निनादति अन गाणी, दाहक यज्ञमहा भव्य दिव्य हे मराठी ! कर कटीवर सावळी परब्रम्ह मुर्ती, टाळ, वीणा, मृदंग गजर आळवती, ज्ञानोबा, तुका संत समईच्या वाती, मानवतेच्या प्रकाशाने तेजाळल्या ज्योती, भावतिर्थाची भूमी अध्यात्म हे मराठी ! टिळक, केशव, विनायक, भीमराव थोरसमर्पण, रक्त वाहिले, जीवन दिधले, समाजपरिवर्तन, झिजले कणकण खरोखर विजयी जीवन, शिवराया साक्ष ठेवून मराठी अभिमान, राष्ट्राची संघर्ष धुनी क्रांती हि मराठी ! स्वराज्य जननी जीजाऊ माय माऊली, स्त्री शिक्षणाचा ध्यास फुले सावित्री धावली, सप्तसुरांच्या संगीताला लतामाई पावली, वंदनिय मातृशक्ती वटवृक्षाची सावली, ज्ञानमंदिरात चेतला मंगलदिप हा मराठी ! गणेशभक्ती उत्सव आनंद पर्वणीला, सण विजया दशमीचा सिमोल्लंघनाला, अंबरी कंदिल दिपोत्सव दिवाळीला, गगनी उभारू गुढी संकल्प नववर्षाला, संस्कृति उत्सवाची उर्जेची स्पंदने ही मराठी ! एकच माती-नाती अनंत मराठी, विश्व कल्याणाचे गीत गातो मराठी, प्रसवते वीरता कण-कणात मराठी, शांतीचा मंत्र जागवतो मराठी, दशदिशात सामर्थ्याची ख्याती मराठी ! *✍️@अमोल तपासे, सीताबर्डी, नागपूर* ©Amol Tapase"

 मराठी
नाद गर्जतो सह्याद्रीच्या कडे-कपारी,
कंठी उद्घोष धन्य आमची वैखरी,
महामंत्र असा स्फूर्ति हृदय अंतरी,
हर हर महादेव शिव छत्रपति,
उजळती किरणे सुर्याची राष्ट्र हे मराठी ! 

आकाशी लहरे विजयी  पताका भगवी,
त्याग, शौर्य, मराठी अस्मितेची निशाणी,
भरूनी मळवट रणचंडिके माय भवानी,
तोफांचे चौघडे निनादति अन गाणी,
दाहक यज्ञमहा भव्य दिव्य हे मराठी !

कर कटीवर सावळी परब्रम्ह मुर्ती,
टाळ, वीणा, मृदंग गजर आळवती,
ज्ञानोबा, तुका संत समईच्या वाती,
मानवतेच्या प्रकाशाने तेजाळल्या ज्योती,
भावतिर्थाची भूमी अध्यात्म हे मराठी !

टिळक, केशव, विनायक, भीमराव थोरसमर्पण,
रक्त वाहिले, जीवन दिधले, समाजपरिवर्तन,
झिजले कणकण खरोखर विजयी जीवन,
शिवराया साक्ष ठेवून मराठी अभिमान,
राष्ट्राची संघर्ष धुनी क्रांती हि मराठी !

स्वराज्य जननी जीजाऊ माय माऊली,
स्त्री शिक्षणाचा ध्यास फुले सावित्री धावली,
सप्तसुरांच्या संगीताला लतामाई पावली,
वंदनिय मातृशक्ती वटवृक्षाची सावली,
ज्ञानमंदिरात चेतला मंगलदिप हा मराठी !

गणेशभक्ती उत्सव आनंद पर्वणीला,
सण विजया दशमीचा सिमोल्लंघनाला,
अंबरी कंदिल दिपोत्सव दिवाळीला,
गगनी उभारू गुढी संकल्प नववर्षाला,
संस्कृति उत्सवाची उर्जेची स्पंदने ही मराठी !

एकच माती-नाती अनंत मराठी,
विश्व कल्याणाचे गीत गातो मराठी,
प्रसवते वीरता कण-कणात मराठी,
शांतीचा मंत्र जागवतो मराठी,
दशदिशात सामर्थ्याची ख्याती मराठी !
*✍️@अमोल तपासे, सीताबर्डी, नागपूर*

©Amol Tapase

मराठी नाद गर्जतो सह्याद्रीच्या कडे-कपारी, कंठी उद्घोष धन्य आमची वैखरी, महामंत्र असा स्फूर्ति हृदय अंतरी, हर हर महादेव शिव छत्रपति, उजळती किरणे सुर्याची राष्ट्र हे मराठी ! आकाशी लहरे विजयी पताका भगवी, त्याग, शौर्य, मराठी अस्मितेची निशाणी, भरूनी मळवट रणचंडिके माय भवानी, तोफांचे चौघडे निनादति अन गाणी, दाहक यज्ञमहा भव्य दिव्य हे मराठी ! कर कटीवर सावळी परब्रम्ह मुर्ती, टाळ, वीणा, मृदंग गजर आळवती, ज्ञानोबा, तुका संत समईच्या वाती, मानवतेच्या प्रकाशाने तेजाळल्या ज्योती, भावतिर्थाची भूमी अध्यात्म हे मराठी ! टिळक, केशव, विनायक, भीमराव थोरसमर्पण, रक्त वाहिले, जीवन दिधले, समाजपरिवर्तन, झिजले कणकण खरोखर विजयी जीवन, शिवराया साक्ष ठेवून मराठी अभिमान, राष्ट्राची संघर्ष धुनी क्रांती हि मराठी ! स्वराज्य जननी जीजाऊ माय माऊली, स्त्री शिक्षणाचा ध्यास फुले सावित्री धावली, सप्तसुरांच्या संगीताला लतामाई पावली, वंदनिय मातृशक्ती वटवृक्षाची सावली, ज्ञानमंदिरात चेतला मंगलदिप हा मराठी ! गणेशभक्ती उत्सव आनंद पर्वणीला, सण विजया दशमीचा सिमोल्लंघनाला, अंबरी कंदिल दिपोत्सव दिवाळीला, गगनी उभारू गुढी संकल्प नववर्षाला, संस्कृति उत्सवाची उर्जेची स्पंदने ही मराठी ! एकच माती-नाती अनंत मराठी, विश्व कल्याणाचे गीत गातो मराठी, प्रसवते वीरता कण-कणात मराठी, शांतीचा मंत्र जागवतो मराठी, दशदिशात सामर्थ्याची ख्याती मराठी ! *✍️@अमोल तपासे, सीताबर्डी, नागपूर* ©Amol Tapase

#ganesha

People who shared love close

More like this

Trending Topic