नातं....(पाऊस आणि मातीच) पावसाच्या सरी कोसळल्या ख | मराठी कविता

"नातं....(पाऊस आणि मातीच) पावसाच्या सरी कोसळल्या खाली सरीवर सरी, घेतात बिलगुनी मातीला घट्ट त्या जमिनीवरी. पावसाचे थेंब लागले टपटप नाचू, ढगांचा खेळ चाले एकमेकांस करती पुढे मागे खेचू. वेगाचा ही वारा सो सो सुटला, निसर्ग ही त्याच्या तालावर डूलू लागला. मातीतला सुवासिक मृदगंध पावसाचा, मनी हृदयी चित्र फुले पहिल्या प्रेमाचा. पाखरे ही बसली घरट्यात घाबरून विजेच्या त्या तेजाला, नाही गवसणी घातली त्यांनी मग अवकाशाला. वेगळेपण आहे किती या नात्यात, नाही कळले कधी कुणास लोक शोधी देवात. अनुभव खूप याचे समोर येत जाती, ठिकाणे वेगळी मात्र आशा निराळ्या राहती. मातीचा तो गंध नवा नवासा, मनास स्पर्श करूनी जातो हवा हवासा. ©Mayuri Bhosale"

 नातं....(पाऊस आणि मातीच) 
पावसाच्या सरी कोसळल्या खाली सरीवर सरी,
घेतात बिलगुनी मातीला घट्ट त्या जमिनीवरी.
पावसाचे थेंब लागले टपटप नाचू,
ढगांचा खेळ चाले एकमेकांस करती पुढे मागे खेचू. 
वेगाचा ही वारा सो सो सुटला,
निसर्ग ही त्याच्या तालावर डूलू लागला. 
मातीतला सुवासिक मृदगंध पावसाचा,
मनी हृदयी चित्र फुले पहिल्या प्रेमाचा.
पाखरे ही बसली घरट्यात घाबरून विजेच्या त्या तेजाला, 
नाही गवसणी घातली त्यांनी मग अवकाशाला. 
वेगळेपण आहे किती या नात्यात, 
नाही कळले कधी कुणास लोक शोधी देवात. 
अनुभव खूप याचे समोर येत जाती, 
ठिकाणे वेगळी मात्र आशा निराळ्या राहती.
मातीचा तो गंध नवा नवासा,
मनास स्पर्श करूनी जातो हवा हवासा.

©Mayuri Bhosale

नातं....(पाऊस आणि मातीच) पावसाच्या सरी कोसळल्या खाली सरीवर सरी, घेतात बिलगुनी मातीला घट्ट त्या जमिनीवरी. पावसाचे थेंब लागले टपटप नाचू, ढगांचा खेळ चाले एकमेकांस करती पुढे मागे खेचू. वेगाचा ही वारा सो सो सुटला, निसर्ग ही त्याच्या तालावर डूलू लागला. मातीतला सुवासिक मृदगंध पावसाचा, मनी हृदयी चित्र फुले पहिल्या प्रेमाचा. पाखरे ही बसली घरट्यात घाबरून विजेच्या त्या तेजाला, नाही गवसणी घातली त्यांनी मग अवकाशाला. वेगळेपण आहे किती या नात्यात, नाही कळले कधी कुणास लोक शोधी देवात. अनुभव खूप याचे समोर येत जाती, ठिकाणे वेगळी मात्र आशा निराळ्या राहती. मातीचा तो गंध नवा नवासा, मनास स्पर्श करूनी जातो हवा हवासा. ©Mayuri Bhosale

#RAIN_Vl

People who shared love close

More like this

Trending Topic