ज्ञानसुर्याचे महापरीनिर्वाण
हिमालयाएवढे अन्यायाचे शिखर
पेनाच्या एका टोकाने फोडले
बाबासाहेब तुम्ही वंचीत
शोषितांना मुख्य प्रवाहात जोडले..
राज्यघटनेचे शिल्पकार तुम्ही
आधुनिक लोकशाहीचे दार उघडले
सामाजिक न्यायाचा देऊनी प्रकाश
वंचित बहूजणांचे तिमीर घालवले..
आधुनिक युगाचे ज्ञानसुर्य तुम्ही
अभ्यास आणि
वाचनाचे व्रत घेतले
आधुनिक भारताचा रचूनी पाया
खरोखर भारतरत्न जाहले..
✍️भुषण ठाकरे
©Bhushan Thakare
#Drops