माहेराला आल्यावर
जुने अल्बम बघत बसते..
वेडी कुठली, ड्रेस घालून
ती बालपण जगत असते..
घराजवळच्या काकुंना
ती अचानक समोर दिसते..
घरी ये ग चहाला
असं हळुच काकू म्हणते..
बालपणीच्या मैत्रिणींची
ती गोष्ट आठवत राहते..
सगळ्याजणी मोठेपणी
सासरी निघुन जाते..
जन्मदात्या तिच्याच गावी
ती पाहुनी बनून जाते..
सांगा बरं माहेरची
आठवण कुणाकुणाला येते..
आठवण कुणाकुणाला येते..
©गोरक्ष अशोक उंबरकर
#library