तुझं माझं करण्यामध्ये पूर्ण आयुष्य निघून जातात
शेवटी कळतं की तुझ माझ करण्यामध्ये काहीच उरत नसत
पावलोपावली माणसाला संकटाशी लढावच लागत
रडताना सुद्धा ही गालावर हसू मात्र ठेवावंच लागत
साऱ्यांनाच वाटतं आयुष्य जगणं फार कठीण असत
कोण सांगे यांना की हे आयुष्य पुन्हा कधी भेटत नसत
शेवटी ना येताना सोबत काही आणलेल असत
ना जाताना काही सोबत घेऊन जायच असत
भेटली की नाही मानव जन्म पुन्हा कधी हे कुणालाच माहीत नसत
भेटलेल आयुष्य म्हणूनच मनसोक्त जगायचं असत
©Raut Vaishnavi
#mountainsnearme