धुराळा
बघ काढतील धान्य उफणावयास पुन्हा...
वाऱ्यासवे धुराळा उडवावयास पुन्हा!
येतात दिस सुगीचे सरताच पाच वर्षे...
सारे उतावळे मग मिरवावयास पुन्हा!
भाषेत गोडवा अन् कैवार घेत जो तो...
येईल रोज नेता समजावयास पुन्हा!
केलेय काय आहे करणार काय आता...
पाढा जुना नव्याने वाचावयास पुन्हा!
काही जनास कळते काहीस त्या कळेना...
येतील त्यास घुट्टी पाजावयास पुन्हा!
माणूस मेंढरागत मग वागतो खुबीने...
शिकणार तो उड्याही टाकावयास पुन्हा!
लाचार लोकशाही ठेवून बंद डोळे...
बघते उभा तमाशा विसरावयास पुन्हा!
जयराम धोंगडे
©Jairam Dhongade
#RepublicDay