ram lalla "श्रीराम जयघोष"
शिवप्रभूंचे श्रीराम,
संत श्रेष्ठीचे श्रीराम,
जनमानसाचे श्रीराम,
पहुडले अयोध्या धाम॥
संपली प्रतीक्षा हनुमंताची,
शरयूच्या त्या जल धारेची,
चविष्ट शबरीच्या बोरांची,
आता जयघोष श्रीराम॥
पुलकित हर्षित इथला कणकण,
रामनामी भिजला श्रावण,
सफल झाले अवघे जीवन,
आता जयघोष श्रीराम॥
भाळी भस्म तव चरणाचे,
स्वप्न अगणित त्या नयनाचे,
मिटलेल्या अमर आत्म्याचे,
आता जयघोष श्रीराम॥
रामनामे खरा जीवना अर्थ,
सफळ संपूर्ण करी परमार्थ,
बालक रूप मोहक सार्थ,
आता जयघोष श्रीराम॥
लक्ष युगे येऊन जातील,
रामनाम जगती राहील,
पुण्य शिळा पावन होतील,
आता जयघोष श्रीराम॥
शाश्वत, श्वासात रामनाम,
जन्मात, मृत्युत रामनाम,
चरचरात जय जय राम,
आता जयघोष श्रीराम॥
पहुडले अयोध्या धाम,
आता जयघोष श्रीराम।।
©Santosh Jangam
#ramlalla कविता "श्रीराम जयघोष"