White #मी..
शब्दवेडा किशोर
भावबंधनाच्या या पाशातून
मिळवणार लवकर मुक्ती मी
सुखस्वप्नांची चव चाखण्या
घेईन नवा जन्म मी
इतरांना रित्या ओंजळीने
सदा सुखं वाटली
अन् त्यांची दुषणं अन् टोमण्यांची ओझी
नित्यनियमाने हसत हसत वाहिली मी
नवा जन्म घेईन तेव्हा सुद्धा
असाच मनमौजी असणार मी
एक शापित जोकर ही माझी ओळख
तेव्हाही मोठ्या अभिमानाने जपणार मी
©शब्दवेडा किशोर
#मी