White जगाच्या या प्रचंड गर्दीत
जेंव्हा एकटं वाटायला लागतं ना!
मनातील असंख्य विचारांच्या गर्दीत
जेंव्हा शांतता मिळत नाही ना!
तेव्हा काय करावं खरंच कळत नाही.
सतत मन काहीतरी शोधत असते..
तेव्हा
स्वतः वर प्रेम करावं
भरभरून प्रेम करावं
स्वतःलाच जपावं
वेळ द्यावा स्वतःला
स्वतःशीच वेड्यासारखं बोलावं..
हसावं दिलखुलास मनास समजावत
ढसाढसा रडावं मन रिकामं करत
स्वतःला कुरवाळावं अलवार मायेने
हरवून जावं स्वतःमध्येच समाधान शोधत
मग द्यावी एक साहसी थाप
स्वतः च्याच पाठीवर
आणि मोठया आवाजात म्हणावं
खुप ताकद अजूनही या मनगटात..
नशीबवान मीच जणू या जगतात
म्हणुनी निवडलं मलाच ईश्वराने
संकटांचा सामना करण्यास
हे येरागबाळ्याचे काम नव्हे....
अजून जीवन बाकी आहे
जिंकणार आहे मी
लढाई अजून बाकी आहे
विश्वास जिवंत आहे माझा
ईश्वरी अजून बाकी आहे....
वाईट घडून गेले त्यास कुस्करत
फुटणार आहे कोंब नव्याने
रुजणार आहे पालवी हसत
उंच उंच वाढायचंय
आभाळ बघ वाट पाहतंय....
ईश्वरी
©Eshwari
#Sad_Status