एकच असू शकते गुपित जागेपणाचे झाले न अजुनी स्वप्न | मराठी शायरी आणि गझल

"एकच असू शकते गुपित जागेपणाचे झाले न अजुनी स्वप्न इथल्या वास्तवाचे लाजळुच्या पाना सहन कर स्पर्श थोडा चल आज मिटवू दे तुझे भय जंगलाचे तू आज ज्या ह्या मारतो आहेस डुबक्या बक्षीस आहे का तळे सांभाळण्याचे? राबायला ये सोहळा समजून घरचा रुसणे बरे नाही जवळच्या माणसाचे इतकेच आयुष्यामधे कर्तृत्व माझे मी जॉब केला, फेडले हफ्ते घराचे दुनियाच झाली एवढी रंगीन ही की दुःखच निरर्थक वाटते डागाळल्याचे . . . . जीवंत तात्पुरती पुन्हा झालीत नाती कारण पुन्हा ठरले मरण नात्यातल्याचे जावे कुठे मग गावकडच्या कावळ्याने चिमणीस जर अप्रूप शहरी कबुतराचे एकनाथ ©Eknath Dhanke"

 एकच असू शकते गुपित जागेपणाचे 
झाले न अजुनी स्वप्न इथल्या वास्तवाचे

लाजळुच्या पाना सहन कर स्पर्श थोडा
चल आज मिटवू दे तुझे भय जंगलाचे

तू आज ज्या ह्या मारतो आहेस डुबक्या
बक्षीस आहे का तळे सांभाळण्याचे?

राबायला ये सोहळा समजून घरचा  
रुसणे बरे नाही जवळच्या माणसाचे

इतकेच आयुष्यामधे कर्तृत्व माझे
मी जॉब केला, फेडले हफ्ते घराचे

दुनियाच झाली एवढी रंगीन ही की
दुःखच निरर्थक वाटते डागाळल्याचे 
.
.
.
.
जीवंत तात्पुरती पुन्हा झालीत नाती
कारण पुन्हा ठरले मरण नात्यातल्याचे

जावे कुठे मग गावकडच्या कावळ्याने
चिमणीस जर अप्रूप शहरी कबुतराचे

एकनाथ

©Eknath Dhanke

एकच असू शकते गुपित जागेपणाचे झाले न अजुनी स्वप्न इथल्या वास्तवाचे लाजळुच्या पाना सहन कर स्पर्श थोडा चल आज मिटवू दे तुझे भय जंगलाचे तू आज ज्या ह्या मारतो आहेस डुबक्या बक्षीस आहे का तळे सांभाळण्याचे? राबायला ये सोहळा समजून घरचा रुसणे बरे नाही जवळच्या माणसाचे इतकेच आयुष्यामधे कर्तृत्व माझे मी जॉब केला, फेडले हफ्ते घराचे दुनियाच झाली एवढी रंगीन ही की दुःखच निरर्थक वाटते डागाळल्याचे . . . . जीवंत तात्पुरती पुन्हा झालीत नाती कारण पुन्हा ठरले मरण नात्यातल्याचे जावे कुठे मग गावकडच्या कावळ्याने चिमणीस जर अप्रूप शहरी कबुतराचे एकनाथ ©Eknath Dhanke

#Anger

People who shared love close

More like this

Trending Topic