विसरणे तुला हे सहज “शक्य” नाही ,
मी तितकाच करतोय प्रेम तुला ,हे पूर्ण “सत्य” नाही ...
मागणे अवेळीच मृत्यू याच्यात “अर्थ” नाही ,
तुझं मागतो मी भलं कसा यात माझाच “स्वार्थ” नाही...
नाही श्वासांना विसावा ,मन कधीच “शांत” नाही ,
तुझ्या आठवणींच्या वेदनांना कसलाच “अंत” नाही...
रक्त डोळ्यातुनी वाहिले मी ,पत्र तुला लिहिण्याला शरीरात “रक्त” नाही,
तुझ्या आठवणींच्या सूर्याला का “सूर्यअस्त” नाही ...
तिच्या बागेतली फुल आम्ही कैक ते सितारे ,
जसे चंद्राचे चांदण्यावर इतकेसे “लक्ष” नाही ...
ती मागते मला रे माझ्या सत्यतेचा पुरावा ,
माझ्याच बाजूने माझीच “साक्ष” नाही ...
माझ्या या ओठांना तुझेच नाव पाठ ,
या बालिश पणाला कुठलेच “तर्क” नाही ...
गणित खूप सोपे ,एकतर्फी प्रेमाचे ,
एकतर्फी प्रेमात कुठलीच “शर्त” नाही ...
करशील विचार माझा ,तुही कुण्या काळी ,
आहे गोड कल्पना हि वास्तव “मात्र” नाही...
तुझ्या नावावर लढण्याला झाले शहर सारे सज्ज ,
माझ्या साठी लढणारा माझा एकही “मित्र” नाही ...
विसरणे तुला हे सहज “शक्य” नाही ,
मी तितकाच करतोय प्रेम तुला ,हे पूर्ण “सत्य” नाही ...
©radheshyam rathod
#raindrops