प्रवास
चुकले तुझे म्हणालो त्याचाच त्रास होता...
साधाच राग कारण त्या कारणास होता!
चंपा जुई चमेली नकली फुले सजवली...
डोळ्यास भावली पण कोठे सुवास होता?
बहिऱ्या मुक्यापुढे मी जोशात व्यक्त झालो...
देतील दाद कोणी माझा कयास होता!
खोटेखरे कळावे जगणे सुखांत व्हावे...
ओढीत याच केवळ केला प्रयास होता!
आला तसाच गेला कळले कुणास नाही...
शापीत जीवनाचा अंतिम प्रवास होता!
©जयराम धोंगडे
#zindagikerang