पितृ देवो भव: 🙏 काळीजही काढून देईल स्वतःच चारही म | मराठी Poetry

"पितृ देवो भव: 🙏 काळीजही काढून देईल स्वतःच चारही मुलींवर एवढं प्रेम त्यांच कुणी हिणवले जरी मुलगा नाही बंद करत हसून तोंड त्यांच काबाडकष्टाने चौघींना शिकविले हरामाचं कधी पटले नाही स्वतः उपाशी राहून दिवसभर मुलींसाठी करे सगळं काही नियम त्यांचे कठोर फार सातच्यात आत उंबरठ्या आत आतून पाझरे हृदय माईचे कठीण कवच वरून ओढले बापाचे उडुन गेल्या भुरभुर चिमण्या अन् काळाच्या पडद्याआड बाबा सावली खाली वटवृक्षाच्या एकटीच उभी ती माता फ्रेममधील बाबा आता आईच्या काळजीत होते तासनतास ते दोघेच न्याहळत ते दिवस आठवत होते फ्रेममधील बाबा हसून कधी कधी मज बोलत असे तू मुलगाच म्हणे या बापाचा जबाबदारीला स्वीकारलेस जसे ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde"

 पितृ देवो भव: 🙏

काळीजही काढून देईल स्वतःच
चारही मुलींवर एवढं प्रेम त्यांच
कुणी हिणवले जरी मुलगा नाही
बंद करत हसून तोंड त्यांच

काबाडकष्टाने चौघींना शिकविले
हरामाचं कधी पटले नाही
स्वतः उपाशी राहून दिवसभर
मुलींसाठी करे सगळं काही

नियम त्यांचे कठोर फार
सातच्यात आत उंबरठ्या आत
आतून पाझरे हृदय माईचे
कठीण कवच वरून ओढले बापाचे

उडुन गेल्या भुरभुर चिमण्या
अन् काळाच्या पडद्याआड बाबा
सावली खाली वटवृक्षाच्या
एकटीच उभी ती माता

फ्रेममधील बाबा आता
आईच्या काळजीत होते
तासनतास ते दोघेच न्याहळत
ते दिवस आठवत होते

फ्रेममधील बाबा हसून
कधी कधी मज बोलत असे
तू मुलगाच म्हणे या बापाचा
जबाबदारीला स्वीकारलेस जसे

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde

पितृ देवो भव: 🙏 काळीजही काढून देईल स्वतःच चारही मुलींवर एवढं प्रेम त्यांच कुणी हिणवले जरी मुलगा नाही बंद करत हसून तोंड त्यांच काबाडकष्टाने चौघींना शिकविले हरामाचं कधी पटले नाही स्वतः उपाशी राहून दिवसभर मुलींसाठी करे सगळं काही नियम त्यांचे कठोर फार सातच्यात आत उंबरठ्या आत आतून पाझरे हृदय माईचे कठीण कवच वरून ओढले बापाचे उडुन गेल्या भुरभुर चिमण्या अन् काळाच्या पडद्याआड बाबा सावली खाली वटवृक्षाच्या एकटीच उभी ती माता फ्रेममधील बाबा आता आईच्या काळजीत होते तासनतास ते दोघेच न्याहळत ते दिवस आठवत होते फ्रेममधील बाबा हसून कधी कधी मज बोलत असे तू मुलगाच म्हणे या बापाचा जबाबदारीला स्वीकारलेस जसे ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde

#Papa पितृ देवो भव:

People who shared love close

More like this

Trending Topic