White #सावरले घरटे एक एक
शब्दवेडा किशोर
सावरले घरटे एक एक
अश्रू टिपत
जखम वेदनेची हळुवार
अश्रू पुसत
मनाची भिंत ढासळत ||१||
जेव्हा आपलेच सोडून गेले
नाती रक्ताचीच घरट्यातून
अलगद उडून गेले
पंख लावुन आकाशी ||२||
बंध नात्याचे तोडून
ठेवले होते का
मीच नाती जपून
ढासळलेल्या घराची
एक एक वीट रचून ||३||
सावरले जेव्हा सारे
तेव्हाच मज मृत्यूने कवटाळले...
सोडून जग सारे इथेच
राहिले ||४||
उलगडले नाही सत्य मज
नात्याचे
मोहातलेच होते का दुरावे
क्षणभंगूर आयुष्य अन्
क्षणात संपणारे सारे ||५||
©शब्दवेडा किशोर
#आयुष्याच्या_वाटेवर