मी सुकत जातो
माझ्या कविता पिकत जातात
लोंबलेल्या गालावर
नकळत हसू पेरत जातात
फुल फळ काळ
सार काही सोडत जातात
अंतरंगातला आनंद
पुन्हा पुन्हा भरत जातात
कल्पतरू मनाचा
आशामय आभाळ भरत जातात
अन् नकळत कित्येक
कवितेच्या प्रेमात पडत जातात
- महेश
8806646250
©Mahesh Desale
माझ्या कविता