आठवणींच्या हिंदोळ्यावर कायम
आपल्या सावल्याच दिसल्या
बसलो होतो शेजारी तरी ही अनोळखी
संगतीने सगळ्या भावनाच रुसल्या
रुसलेपण काढताना देह होते शेजारी तरी
ही त्यावर होती धडधडणाऱ्या श्वासांची मुजोरी
देहांनी अलगद दिले होते अलिंगन ,सुटल्या केसात
वाढत्या श्वासात अधरांचे झाले गुलाबी मिलन
देहांतर मिटले नी तुझ्यात मी नी माझ्यात तू
कसे जणू सर्पचंदनी वेढ्यात भेटले
पुन्हा पुन्हा उंगल्या फिरत होत्या देहावर ,
फिरून पुन्हा नव्याने नवीन प्रणयी होता बहर
बहरल्या प्रणयी खेळात तू तर रंगून गेलास ,
रंगून रंगात माझ्या मी राधा तू कृष्ण झालास
कृष्णरंगी राधा ही रंगून गेली,रंगल्या रात्रीत
पुन्हा तुझी कृष्ण सावली झाली
पल्लवी फडणीस,भोर✍🏻
©Pallavi Phadnis
#Love