White शीर्षक: वेड सावळ्या कृष्णाचे
काय सांगू सखये बाई
असे कसे आक्रीत झाले
वेड सावळ्या कृष्णाचे
मला खरोखर लागले १
मन माझे वेधले त्याने
माझी मी नच राहिले
भुलले बाई सावळ्याला
जेव्हा कान्हास पाहिले. २
ऐकता मधूर मुरलीचे स्वर
देहभान माझे हरपले
काय सांगू काय जादू झाली
कान्होबाच्या रंगात रंगले. ३
सावळ्याचे रुप मनोहर
डोळे भरून म्या पाहिले
स्वर्ग लोकीचे सुख सखी
आज खरेच मज लाभले. ४
मुर्ती मंत विष्णू स्वरूप
जेंव्हा सावळ्यास पाहिले
नाही आता परत येणे जाणे
आयुष्य माझे धन्य जाहले ५
©somadatta kulkarni
#Krishna