तुझ्यापाशी येता येता, गाव तिचं लागलं,
मी ही मग डोकावून जरा, घराकडे तिच्या पाहिलं...
होती अगदी हसत ती, मिठीत त्याने घेतल्यावर,
बिथरली का कुणास ठाऊक, नजर माझी भिडल्यावर...
मी मात्र तिला नजरेतून, धीराने घेण्यास सांगितलं,
मी नाही तर काय झालं, जवळ आहे जे तू मागितलं...
एका नजरेत माझ्या ती, निश्चिंत अजूनही होते,
अशा प्रेमाला का नियती, दुसऱ्याच्या मिठीत देते ??
स्वप्नील हुद्दार
.
©Swapnil Huddar
#Loneliness