White रंग जीवनाचे
शब्दवेडा किशोर
रंग हे जीवनाचे सुखाचे अन् दुःखाचे
कधी रे भाग्याचे येती जाती
फिका रे पडतो रंग बळीराजाचा
मारा दुष्काळाचा सालोसाली
विधवा वीरपत्नी अधुरा संसार
तिरंगा आधार लेकरांना
असाह्य जीवन आत्महत्या बळीराजाची
उघड्या संसाराची परवड
पांढरे बगळे मग येती शेतशिवारी
ढोंगी त्यांची वारी असे गावोगावी
रंगाचा बेरंग चुकता पाऊल
तयाची हत्तीची रे चाल असे जीवनात
जीवन गणित नाही कुणा कळे
फुलवावे स्व-कर्तृत्वानं आयुष्याचे मळे
संत सारे आपणा सांगुनिया जाती
जसे ज्याचे कर्म तसे फळ रे त्या कर्माचे
रंग सारे जीवनाचे ते बदलती
©शब्दवेडा किशोर
#रंग_आयुष्याचे मराठी कविता प्रेम