टपोनो बैसले बोके, नामाचे घेऊन ठेके
संसार भाकरी शेके, हे करंठे ll धृll
आद्य आत्मा नसे ठाव, कुटील टाकुनी डाव
सोंगाडे घेतात नाव ,स गुणाचे ll १ll
बुजगवण्याना देतो,आधार देण्यास येतो,
त्यास जो जो आळवितो, आवडीने ll २ll
पाप पुण्य खोटे खरे, निःस्वार्थ चरण धरे
सर्व खळास उध्दारे, राजे म्हणे ll ३ll
©Rajendrakumar Jagannath Bhosale
#sad_shayari अभंग १००