White चल सजवू तळहातावरी
आपल्या स्वप्नांचा नजारा...
आज इथे ना कोणी
निरव हा किनारा....
ये ना जरा... जवळी साजना...
क्षण मिलनाचा आपुला...
एकलाच तू असा
सोबतीस ना... तारा...
अशा एकाकी क्षणांचा
शोधसी का सहारा....
ये ना जरा... जवळी साजना...
क्षण मिलनाचा आपुला...
असतील तुजपाशी
लक्ष चांदण्यांचा पसारा...
विसरू नकोस कधीही
आवस पुनवेचा इशारा...
ये ना जरा... जवळी साजना...
क्षण मिलनाचा आपुला...
©Pravin Pawade
#love_shayari