नाही आलो एकत्र तरी चालेल
पण आपलं ब्रेकअप व्हायला नको
भेटलोच नाही जर पुन्हा कधी
आपलं बोलणं बंद व्हायला नको...
आलोच जर समोर कधी एकमेकांच्या
नजरेला नजर मिळवायला घाबरशील नको
बिनधास्त बोलायचं आपण नेहमीसारखं
नजर चोरून माघारी फिरून रस्ता बदलशील नको...
आहोत तसेच राहायचं आयुष्यभर आपण
शेवट झालं नात्याचं म्हणून आठवणी विसरशील नको
कुणीही आलं जरी आयुष्यात आपल्या
हा स्वभाव आताचा मात्र कधी बदलशील नको....
जातीपायी माती झाली अनं समाजासाठी विरह आलं
म्हणून स्वतःसाठी जगायला विसरशील नको
गेलोच जर सोडून हे जग कायमचं
न चुकता रोज आठवण काढायला विसरशील नको...
मला ही त्रास होतो हे प्रत्येक शब्द लिहिताना
म्हणून प्रत्येक कवितांना माझ्या वाचायला विसरशील नको
दुर्दैवाने झालोच जर कायमचे कधी वेगळे
हृदयातून मात्र तुझ्या मला कधीच काढशील नको...
©अश्लेष माडे (प्रीत कवी )
thoughts about love failure