मी बघितलं नेहमीच
तिच्या स्वप्नांची राखरांगोळी होताना
फाटलेली साडी एका कडेवर पोर
अनं रस्त्यावरच्या दुकानातून वस्तू घेताना...
खूप स्वप्न सजविली असतील लग्नाआधी
पण बघतोय क्षणोक्षणी स्वप्न तुटताना
दोघांनाही होत असतीलच यातना संसारात
पण अश्रू बघितलं तिच्याच डोळ्यातुन निघताना...
प्रेम असतं की क्षणिक आकर्षण
पण बघितलं असे अनेक लग्न होताना
ज्यांच्या अधिक अपेक्षा असतात लग्नाआधी लग्नानंतरच्या
अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून बघितलं असे नाते तुटताना...
काही सगळं सहन करून करतात संसार शेवटपर्यंत
तर काहींना बघितलं अर्ध्यात संसार सोडून जाताना
जे सोडून जातात गरजेनुसार नातं ठेवून
बघितलं त्यांचेही पुढे वाईट हाल होताना...
लग्नाआधी राजकन्या सारखी असणारी
बघितलं लग्नानंतर मातीच्याही कामाला जाताना
आपणच तोलतो पैसे आणि गरजेनुसार नातं
पण बघितलं मी काहींना भीक मागून संसार करताना...
सगळं काही जास्त अपेक्षेवर अवलंबून असतं
कित्येकांना बघितलं मन मारून जगताना
ज्यांना कोणत्याही परिस्थितीत नातं निभावता आलं
त्यांना फार कठीण वाटत नाही गरिबीत आयुष्य काढतांना...
©अश्लेष माडे (प्रीत कवी )
motivational thoughts in marathi motivational quotes in marathi motivational thoughts on life