#मीहॉस्टेलाइट#
काय नाय होत रे ? म्हणणारे
मित्र यादीतून कमी होत चाललेत
गोळ्या औषधे देणारे लोकं
मित्र यादीत वाढत चाललेत
बऱ्याच आजारांवर
मित्रांची फक्त सोबत हे
जालीम औषध असते
कदाचित तेच काळाच्या ओघात
कमी होत जाताना दिसते
म्हणायला आपण
व्हाट्स ऍप, फेसबुकवर टच मधे असतो
पण मैत्रीची ऊब ही
प्रत्यक्ष भेटण्यामधे असते
- मनिष ज्ञानदेव कानडे, पुणे
©Manish Kanade