मी तिला विचारले एकदा, "का फक्त भासात आहेस तू?"
ती उत्तरली कसे समजावू तुला वेड्या, "श्वासात आहेस तू..."
मी कशातून जातोय याचा अंदाज मला लागला नाही,
तिने मिठीत घेऊन ओळखलं , "त्रासात आहेस तू..."
मी इथे तळमळतो अन् तिला तिथे उचकी लागते,
कळवते ती घेणाऱ्या प्रत्येक, "घासात आहेस तू..."
तिच्यापर्यंत पोहोचतो मी, तरी तिचा होता येत नाही,
"प्रेम मिळविण्याच्या कठोर, प्रवासात आहेस तू..."
डिवचले मी, "माझ्यासाठी कधी नस कापून घेशील का?"
"नेमकी कुठली कापू तूच सांग, नसानसात आहेस तू..."
स्वप्नील हुद्दार
.
©Swapnil Huddar
#Love