White पाऊस दुःखाचा...
रात्रीच्या अविरत पावसासारखे
माझे दुःख येणार
माझ्याच हृदयावर पडून
ह्रदय माझे चिंब भिजवणार
पहाट पुन्हा होईल आशेवर
डोळे वेदनेने पाणवणार
ना थांबा ना सुरुवात
असच आयुष्य माझं सरणार
भिजून रात्रीच्या या पावसात
उभी मी तशीच राहणार
हात नको कोणाचा हाती
छत सोडून मी निघणार
निघून गेली रात्र जरी
पाऊस दुःखाचा कसा संपणार
आयुष्याच्या अंताशी तरी
आकाश माझे निरभ्र होणार...
-अमृता
©Amruta
#sad_qoute