कुठली भाजी करायची रोज
तुझ तूच ठरवून घे..
सांज सकाळ विचारण्याची
सवय आता बदलून घे..
शॉपिंग शॉपिंग म्हणते नेहमी
माहेरी जाऊन करून घे😂..
आठ दिवस गावी जाऊन
तिकडेच माहेरी फिरून ये..
एकदाच काय सांगायचं ते
तासाभरात बोलून घे..
उरलेल्या 23 तासात मला
शांतपणे जगू दे..
आहे तो पर्यंत तरी मला
मोकळा श्वास घेऊ दे..
श्र्वासासोबत किरकिरी ची
किमान सवय तरी होऊ दे ..
©गोरक्ष अशोक उंबरकर
happy birthday बायको