स्त्री
स्त्री दीड अक्षराचा शब्द,
पण विशाल व्यापक अर्थ
श्रुष्टीच जणू अवघी सारी,
एकाच शब्दात समावलेली..
तिच आरंभ तिच अंत,
तिची अमाप सहनशीलता
तिच अग्नी तिच शितलता,
अनंत अंतराळाची चंचलता..
तिच प्रेमाच जिवंत स्वरूप,
शक्तीच ही भयंकर उग्र रूप
जन्म देनारी सांभाळणारी तिच,
तिच्यामुळे अस्तित्व आपलं..
तिच्या शिवाय सर्वस्व अपूर्ण ,
तिच प्रेरणा दया माया करुणा
तिच भक्ती विरक्ती उत्पत्ती,
तिच नारायणी तिच महामाया.!!
©Vinod Ganeshpure
#womensday #vbgpoemsworld #nojotahindi