रूप तुझे ....
रूप तुझे
अंधारात लखलखणाऱ्या प्रकाशित ताऱ्यांसारखे.
रूप तुझे
कोळशाच्या खाणीत चमचमणाऱ्या हिऱ्यासारखे.
रूप तुझे
सागरात असणाऱ्या शिंपल्यातील शुभ्र मोत्यासारखे.
रूप तुझे
मोगऱ्याचा सुगंध बागेत दरवळल्यासारखे.
रूप तुझे
साजिरी गोजिरी दिसणाऱ्या नक्षत्रासारखे.
रूप तुझे
मंद झुळझुळ वाहणाऱ्या संथ वाऱ्यासारखे.
रूप तुझे
रात्रीच्या गोड लाजणाऱ्या चंद्रासारखे.
रूप तुझे
सुंदर मनाला भुरळ घालणाऱ्या मोहिनी सारखे.
©Mayuri Bhosale
#रूप तुझे