White आयुष्य हा गोतावळा
जणू कैवल्याचा मेळा
विविध नात्यांच्या नाना कळा
कधी गैरसमज चा हिंदोळा ||१||
कुणी रागीट,कुणी भोळा
कुरबुरी वर कानाडोळा
जपायचा हा जिव्हाळा
संभाळूनी या वादळा ||२||
भासे मधमाशी चा पोळा
सुमना भोवती पाखरं गोळा
कधी नात्यांचा पाचोळा
तर कधी बरसे घननिळा ||३||
कधी श्रृंगार दिसती सोळा
कधी मधुर गित गायन गळा
कधी भिडे डोळ्याशी डोळा
घेई संभाळूनी विठू सावळा
||४||
©शब्दवेडा किशोर
#माझ्या_लेखणीतून