न बोललेल्या शब्दांना
लिहायला छान जमतं..
लिहिताना ही मन माझं
तितकच तुझ्यात रमतं..
तुझ्यावर लिहिताना
मनातलं तुझ्या कळतं..
तुझ्यात मला रमताना
वेगळं सुख मिळतं..
पानावरती लिहितांना
शब्दांच छान जुळतं..
तुझ्यासमोर बोलताना
सारं गणित माझं अडखळतं ..
सारं गणित माझं अडखळतं..
©गोरक्ष अशोक उंबरकर
#sad_quotes