उतारा
शासकाचा गुंडवृत्तीला दरारा पाहिजे...
कायद्याला कायद्याची ठोस धारा पाहिजे!
माणसाला फोन इंटरनेटचा डाटा हवा...
भेटले तर अन्न कापड अन् निवारा पाहिजे!
कोडगी झाली पिढी धुंदीत आहे आपल्या...
नेमका पण टोमण्यांचा रोज मारा पाहिजे!
बी बियाणे शेतसारा कर्ज आणिक नापिकी...
राहिला शाबूत आता सातबारा पाहिजे!
लेकबाळी पादचारी कामगारांच्या व्यथा...
आज नाकर्तेपणावर या उतारा पाहिजे!
जयराम धोंगडे (९४२२५५३३६९)
©Jairam Dhongade
#happyteddyday