White जीवनात नकळत अशी
कोमल कळी उमलते..
उमलताना बरेच काही
सुंदर क्षण फुलवते..
नाजूक कळी जणू
हळूहळू बहरते..
बहरताना चोहीकडे
सुगंध तिचा दरवळते..
लाडक्या कळीला आपण
जिवापाड जपायचे....
परक्याचे धन म्हणत
दुसऱ्या हाती सोपवायचे..
अश्रू लपवत फक्त
दुःख मनात साठवायचे..
शेवटी यालाच तर
कन्यादान असे म्हणायचे ..
कन्यादान असे म्हणायचे
©गोरक्ष अशोक उंबरकर
कन्यादान