ओळख जशी स्त्री ची तशी
दिसतेस एकदम भारी
तुझ्या सौन्दर्याला शोभेल अशी
घातलीस जेव्हा नऊवारी...
खुलून आलं सौन्दर्य अधिक तुझं
जेव्हा तुझ्या अंगावर दिसली साडी
आणि बघताक्षणी फोटो तुझी
सुन्न पडली माझी सर्व नाडी...
करावी तितकी स्तुती कमीच
दिसते सुंदर अशी मराठमोळी
खुले लांब केसं अनं मादक तुझी अदा
खुलून दिसते तुझ्यावर ही साडी...
साडी म्हणजे स्त्री च्या संस्काराचं दर्शन
आता फक्त नाकात नथ अनं केसांना गजऱ्याची कमी
साडी म्हणजे परंपरेचे दर्पण
मृणाली आता काय तुझ्या सौन्दर्याला कमी?
सडपातळ नाजूक कोमल अशी तू
अजून काय हवं आणखी सुंदर दिसायला
वेगळीच दिसते अदा तुझी साडीवर
म्हणून काय जातं मृणाली
तुझ्यावर कविता लिहावंसं वाटायला....
©अश्लेष माडे (प्रीत कवी )
poetry in hindi poetry on love most romantic love shayari in hindi for boyfriend